Breaking News

चिरनेर येथील ट्रान्सफार्मर परिसराला आग

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील चिरनेर जवळील मोठे भोम परिसरातील रहिवाशांच्या घरात, दुकानात करण्यात येणार्‍या विद्युत वाहक ट्रान्सफार्मर परिसराला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. 27) घडली. चिरनेर गावातील नागरिक व गावातील महावितरण कार्यालयातील कर्मचारी यांच्या प्रसंगावधानतेमूळे आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला आहे.

उरण महावितरण कार्यालयातील उप अभियंता हरिदास चौंडे यांनी उरण शहर, गावोगावच्या ट्रान्स फार्मर परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि गवत वाढले आहे. अशा वाढत्या झाडांमुळे, गवतामुळे ट्रान्स फार्मर परिसरात आगी लागून जिवीत व वित्तहानी होण्याचा संभव आहे. परंतु या घटनेचे गांभीर्य महावितरण कार्यालयातील अधिकार्‍यांना नसल्याचे रहिवाशांमध्ये चर्चेले जात असताना चिरनेर येथील मोठे भोम परिसरातील रहिवाशांना विद्युत पुरवठा करणार्‍यात येणार्‍या ट्रान्सफार्मर परिसराला आग लागण्याची दुदैवी घटना घडली.

या ठिकाणाहून रहदारी करणार्‍या नागरिकांच्या निदर्शनास ही आगीची बाब येताच नागरिकांनी प्रसंगावधानता बाळगून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच या आगीची माहिती चिरनेर महावितरण कार्यालयातील कर्मचारी यांना मिळतात त्यांनी नागरीकांच्या मदतीने शर्यतीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply