Breaking News

एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी

पुणे ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधून जाणार्‍या नाशिक-पुणे महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा बुधवारी (दि. 20) पहाटे भीषण अपघात झाला.

या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंबादास दिनकर खेडकर (32) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे बस चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे बस आगारातील बस (एम.एच-20 बी.एल-3426)  साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात असलेली ही बस धडकली.  या भीषण अपघातात बस वाहक अंबादास यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी बस चालकाला दोषी धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply