पनवेल : रामप्रहर वृत्त : नेरे ग्रापंचायत आणि लायन्स क्लब पनवेल शाखेच्यावतीने मोफत महाआरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीराचा लाभ परिसरातील अनेक गरजूंनी घेतला. या शिबीरामध्ये वाशी येथील फोर्टिज हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीराचा लाभ अबेज गरजुंनी घेतला. या शिबीराच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री म्हसकर, लायन्स क्लबच्या ज्योती देशमाने, भावना जेसवानी, शोभा गिल्डा यांच्यासह पदाधिकारी, डॉक्टर, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …