Breaking News

सेंट अॅन्ड्र्यूज स्कूलचा संयुक्त ‘दीपस्तंभ’

पनवेल : रामप्रहर वृत्त : श्री ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था संचालित सेंट अ‍ॅन्ड्र्यूज स्कूलचा संयुक्त ‘दीपस्तंभ’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आकुर्ली येथील मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्याला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत स्कूलच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे,  जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, सरपंच सचिन पाटील, उपसरपंच आलूराम केणी, ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, सुष्मा पाटील विद्यालयाचे प्रिंसीपल मंदार पनवेलकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्याथी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply