पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला नसून जनतेची सेवा करणारा, नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 30) केले. भाजपचे युवा नेते प्रतिक बहिरा यांनी पनवेल तक्का येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
तक्का येथील मराठी शाळेजवळ भाजप युवा नेते प्रतिक बहिरा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश शेठ ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, रायगड जिल्हा मराठा समाज अध्यक्ष विनोद साबळे, संदीप बहिरा, देवचंद बहिरा, वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, जेष्ठ नेते मनोहर मुंबईकर, एकविरा युवक मंडळ अध्यक्ष संदीप खुटकर, युवा नेते सागर बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्री युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, प्रतिक बहिरा यांनी परिसरातील नागरिकांची सेवा करता यावी तसेच समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराची सेवा करणे म्हणजेच देशाची सेवा करणे ही भावना ठेवून प्रतिक बहिरा समाजसेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …