Saturday , March 25 2023
Breaking News

जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त : ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. परम शांतीधाम वृद्धाश्रम, तळोजा येथील वृद्धाश्रमात सुमारे 60 वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला वृद्धाश्रमाचे सर्वेसर्वा परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शिष्य आबानंद महाराज यांनी जे. डी. तांडेल यांचे सपत्निक स्वागत केले. कन्या सोनल तांडेल यांनी प्रत्येकी 11,111 रु. चा धनादेश आश्रमाला देणगी म्हणून दिला. दुपारी फुले सभागृहात जे. डी. तांडेल तसेच वैशाली येडे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार कवी अरुण म्हात्रे यांनी घेतली. वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नी आहेत. या कार्यक्रमाला अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ  पाटील, दूरदर्शन संचालक जयू भाटकर, माजी प्रिन्सिपल डी. बी. कदम, आगरी दर्पणचे संपादक दीपक म्हात्रे, पनवेल सेंट्रल रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रमेश पटेल, एमआयडीसी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. माळी, अतुल पाटील, अखिल आगरी समाज परिषदेचे सहचिटणीस डी. बी. पाटील,  बा. गो. पाटील, श्याम मोकल, व्ही. एस. म्हात्रे, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे खजिनदार अनंतराव पाटील, पनवेल सेंट्रल रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आप्पा चंदणे, डॉ. लक्ष्मण आवटे, प्रकाश कदम, संतोष घोडिंदे,  मनस्वी पाटेकर, कमलाकर पवार, ज. गो. म्हात्रे आदी मान्यवर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच  जयवंत तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त आगरी शिक्षण संस्थेच्या शिशुवर्गाला हायजेनिक किट्सचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये जे. डी. तांडेल यांनी आगरी शिक्षण संस्थेच्या नावे लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 25 हजारांचा धनादेश दिला. भविष्यात या धनादेशाच्या व्याजावर इयत्ता 12वीमध्ये आर्ट्स्, कॉमर्स, सायन्समध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या  विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळणार, असे या वेळी जाहीर केले.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply