पनवेल : भाजप कळंबोली शहर मंडल अध्यक्षपदी रविनाथ पाटील यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक महादेव मधे, राजेंद्र शर्मा, तसेच प्रकाश शेलार, राजेंद्र बनकर, संदीप भगत, विलास किटे, संतोष वांढेकर, केशव यादव आदी उपस्थित होते.