मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक महाडचे आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी (दि. 11) अपघात झाला. आमदार गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेस वेवरून निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
स्वतः आमदार भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अपघाताबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाला. एक टॅक्सी रस्त्यात उभी राहिली असता मागून जाणार्या आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. आमची गाडी पाचवी होती. आमच्या पुढे पोलिसांची गाडी होती. पोलिसांच्या गाडीवर आमची गाडी आदळली आणि नुकसान झाले, पण कोणालाही काही दुखापत झालेली नाही. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …