Breaking News

गुळसुंदे विभागात विकासकामांचा झंझावात

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती विभागातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले.

यामध्ये दहा लाख रुपयांच्या निधीतून लाडीवली येथील स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, 30 लाख रुपयांच्या निधीतून  गुळसुंदे येथील शंकर मंदिर परिसर सुशोभिकरण करण्याच्या कामाचे लोकार्पण, 30 लाख रुपयांच्या निधीतून गुळसुंदे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, 97 लाख रुपयांच्या निधीतून वावेघर येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, 15 लाख रुपयांच्या निधीतून वावेघर येथील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे लोकार्पण, 10 लाख रुपयांच्या निधीतून जाताडे येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे लोकार्पण, सात लाख रुपयांच्या निधीतून पोसरी येथील अंतर्गत आर.सी.सी. गटराचे लोकार्पण, दोन लाख रुपयांच्या निधीतून वावेघर येथे पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन, 95 लाख रुपयांच्या निधीतून तुराडे येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ, 15 लाख रुपयांच्या निधीतून तुराडे येथील ग्राम पंचायत कार्यालय बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन, सहा लाख रुपयांच्या निधीतून रसायनी कॉर्नर येथे बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले.

रसायनी कॉर्नर येथे बस थांबा लोकार्पण सोहळ्या वेळी सरपंच संगीता काळूराम तोंडे, उपसरपंच बंडू चांगु शिद, सदस्य सुनीता कमलाकर शिद, ग्रामसेवक अंकुश पाटील, सुजित पाटील, सुमेधा पाटील, भारतीनाथ पाटील, विशाल जोशी, कमलाकर शिद, सचिन शिंदे, चंद्रकांत जांभुळकर तसेच लाडिवली स्मशानभूमी रस्ता लोकार्पण सोहळ्यावेळी गुळसुंदे सरपंच हरिश्चंद्र बांडे, प्रभाकर कार्लेकर, अनंता म्हामणकर, राम कार्लेकर, दत्तात्रेय कार्लेकर, मंगेश जाधव, वसंत गोळे, भगवान गोडिवले, महोदव शिर्के, मोहन वाघे, भास्कर पाटील, योगेश गोळे, समीर भोईर, गणपत गोठळ, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती कार्लेकर, अनामिका म्हामणकर, इंदूबाई शिर्के, कोमल वाघे, शारदा कार्लेकर, शितल शिगवण, मानसी कार्लेकर, शर्मिला जाधव, हर्षदा शिर्के, लोना सप्लाय कामगार आदी उपस्थित होते.

याचबरोबर गुळसुंदे शंकर मंदिर सुशोभिकरण कामाच्या लोकार्पणावेळी सदस्य मनोज पवार, माजी सरपंच आर. डी. पाटील, प्रमोद विध्वंस, यशवंत जाधव, जितेंद्र गाताडे, प्रशांत पाटील, अजिंक्य सुर्वे, दिपक पारंगे, संतोष चौलकर, सतीश साठे, बाळू जोशी, प्रकाश जोशी, सुरेश जोशी, यशवंत जोशी, मिन्नाथ तांबोळी, नामदेव मांडवकर, जयराम शिंदे, दीपक मिसाळ, महादेव कावडे, सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच हरिश पाठारे, सतीश भोईर, सतीश ठाकूर, संदीप दळवी, महिला अध्यक्ष दिपीका ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते काका गायकवाड, सुनील राठोड, प्रफुल पाठारे, अक्षय पाठारे, महादू दोरे, कमलाकर पारधी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply