Friday , September 29 2023
Breaking News

पनवेल मनपाची 126 कोटींची वसुली

मालमत्ता कर भरणा करण्यास नागरिकांचा प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी
नवीन आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणार्‍या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. मागील एप्रिल महिन्यापासून ते 22 जूनपर्यंत 126 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे. या कारवाईसाठी चार प्रभागासाठी आठ पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये खारघरसाठी दोन पथक, कामोठेसाठी दोन पथक, नावडेसाठी दोन पथक, कळंबोलीमध्ये दोन पथक, पनवेल व नवीन पनवेलसाठी प्रत्येकी एक पथक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक पथकामध्ये एक महापालिका कर्मचारी, दोन निवृत्त अधिकारी, एक सिक्युरीटी गार्ड, एक कॅमेरामॅन असे सहा सदस्य आहेत.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी पालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘झचउ ढअद अझझ’ मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे, तसेचुुु. रिर्पींशश्राल.ेीस या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. न्यायालयानेही मालमत्ता कर, वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे

Check Also

विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त साधी राहणी व उच्च विचारसरणी हे …

Leave a Reply