Breaking News

महिलांनी आपल्या मनातील भीती दूर करावी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उंचावले मनोबल, महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी

आज सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना महिलांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. अबोली रिक्षा महिला संघटनेच्या वतीने पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडेकर, दैनिक वादळवाराचे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष अनिल भोळे, पत्रकार दीपक महाडिक, संजय कदम, रत्नाकर पाटील, साहिल रेळेकर, राज भंडारी, भरतकुमार कांबळे, शैलेश चव्हाण, रूपाली शिंदे, योगेश पाटील, शेकापचे सरचिटणीस प्रभाकर कांबळे, मोटर वाहन निरीक्षक श्री. करसे आदी उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रशिक्षणवर्गाला शुभेच्छा देताना सर्व महिलांचे अभिनंदन करून सर्व महिला रिक्षा चालवत अहोरात्र करत असलेल्या मेहनतीचे कौतुकही केले. सर्वप्रथम व्यवसाय करताना महिलांनी मनातील भीती दूर करावी. कारण आज सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आपले घर सांभाळत आहेत. जितकी अधिक मेहनत घेऊ त्याप्रमाणे नफा होत राहील, असे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महिलांचे मनोबल उंचावले.

हे प्रशिक्षण अबोली महिला रिक्षा संघटनेच्या स्वखर्चाने होत असून अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी गरीब, गरजू महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जाहीर केल्यानंतर महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. किमान 35 ते 40 महिलांना प्रशिक्षण मिळेपर्यंत हे वर्ग सुरू राहणार आहेत.

रिक्षा व्यवसायासाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छुक गरीब महिलांसाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. ज्या महिलांकडे पिवळे रेशनकार्ड आहे, अशा महिलांसाठीच ही योजना असून गुरुवारपासून प्रशिक्षणास सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुलोचना भगत, उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

महागाईमुळे कुटुंब चालवताना महिलांना कसरत करावी लागते. काहीतरी व्यवसाय करावा, अशी त्यांची इच्छा असते, पण व्यवसायासाठी भांडवल, मार्गदर्शन मिळत नसल्याने त्या व्यवसाय करू शकत नाहीत. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे भांडवलाअभावी व्यवसाय करू न शकणार्‍या महिलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

-संतोष भगत, संस्थापक अध्यक्ष

 अबोली महिला रिक्षा संघटना

अनेकदा महिलांना रिक्षा चालवताना शहरात नाक्यांवर दमदाटी केली जाते किंवा अडचणींना सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांनी न घाबरता वाहतूक शाखेकडे तक्रार करावी, जेणेकरून कायद्याच्या दृष्टिकोनातून दोषींवर कारवाई केली जाईल.

-अभिजित मोहिते,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

प्रत्येक महिला स्वयंसिद्ध होत असून घराची चौकट ओलांडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर आहे. महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांना रिक्षा व्यवसाय करताना अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे.

-हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, पनवेल परिवहन

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply