पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अजरामर विनोदी नाटक ऑल दि बेस्ट आणि धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आज्जीबाई जोरात ही दोन्ही नाटके हाऊसफुल्ल होती. या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून झाले.
उत्तर रायगड भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध अशा दोन नाटकांचे चार प्रयोग नागरिकांना मोफत पहावयास मिळाले. मराठी रंगभूमीवरील अजरामर विनोदी नाटक ऑल दि बेस्टचा प्रयोग 6 व 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता, तर शालेय मुलांकरिता सध्याचे धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आज्जीबाई जोरात6 व 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता सादर झाले.
या नाट्य महोत्सवाचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी शुभारंभ झाला. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप महिला मोर्चा पनवेल शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, अमोल खेर, चिन्मय समेळ, वैभव बुवा, उन्मेश कोळी यांच्यासह निर्मिती सावंत, पुष्पर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेरडे, मनप्रीत पेम, मयुरेश पेम, विकास पाटील, रिया अग्नीहोत्री हे कलाकार उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …