Breaking News

सुधारित नागरिकत्व कायद्याचे विद्यार्थ्यांकडून समर्थन

पुणे ः प्रतिनिधी

देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, दुसरीकडे देशभरात मात्र सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करीत हिंसाचार सुरू आहे. लखनऊत  आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. लखनऊमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, हिंसाचार सुरू असताना पोलीस चौकीला आग लावण्यात आली असून, बाहेर उभी असलेली अनके वाहने आंदोलकांकडून पेटवण्यात आली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply