Breaking News

उद्योगधंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका

तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका बनविण्याचे काम तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर पुस्तिकेचा फायदा तेथील मालक, कामगार वर्गासह सर्वसामान्य लोकांना होणार असल्याने सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये आज 850 च्या आसपास छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू आहेत. अनेक नामांकित कंपन्यांसह इतर लघुउद्योजक मच्छि कंपनी, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. हा परिसर मोठा असल्याने त्या परिसरातील अनेकांना पूर्ण माहिती होत नाही. तसेच एखादी कंपनी कुठे आहे? त्याचा मालक कोण आहे? त्या ठिकाणी किती कामगार आहेत? त्यातील स्थानिक कामगार किती? व परराज्यातील कामगार किती? याची माहिती, कंपनी काय बनविते? कंपनी किती शिफ्टमध्ये चालते? कंपनीच्या अंतर्गत युनियन आहेत का? असल्यास कोणत्या? यासह इतर अनेक संबंधित छोटी-मोठी माहिती या पुस्तिकेमध्ये असणार आहे. या पुस्तिकेमुळे त्याचा फायदा त्या भागातील कामगार वर्गासह इतरांना सुद्धा होणार आहे. या कंपन्यांचे संपर्क नंबर एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडे तयार होणार माल आदी संदर्भात माहिती या पुस्तिकेत जोडली जाणार असल्याने तळोजा औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने हा उपक्रम एक अत्यंत फायदेशीर असा उपक्रम बनणार आहे. ही पुस्तिका पूर्ण माहितीनिशी बनविण्यासाठी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण हे पूर्ण लक्ष या विषयाकडे देवून आहेत व त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास सुरू असून तशा स्वरुपाची माहिती ते प्रत्येक कंपनीकडून घेत आहेत. लवकरच ही पुस्तिका तयार होवून तिचा फायदा मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला सुद्धा होण्याची शक्यता आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply