उरण : वार्ताहर
देशाचे थोर सुपुत्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उरण तालुका भाजपच्या वतीने उरण नगरपरिषद येथे बुधवारी (दि. 25) साजरी करण्यात आली. वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका महिला अध्यक्षा संगिता पाटील, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेवक नंदु लांबे, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेवक धनंजय कडवे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका सरचिटणीस दिपक भोईर, ग्रामपंचायत गोवाठणे सदस्य मनोज पाटील, ग्रामपंचायत गोवाठणे सदस्य संतोष वर्तक ग्रामपंचायत गोवाठणे सदस्या प्राची निर्णय पाटील, देवेंद्र घरत, युवानेते मिलिंद पाटील, पूर्व विभाग भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुगंधा सुधिर कोळी, भाजप तालुका कार्याध्यक्ष डी. बी. गावडे आदी उपस्थित होते.