Breaking News

शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; प्रशासनाचे आवाहन

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना पिकासाठी वरदान असून, शेतकर्‍यांनी किमान हप्ता भरून पिकांचा व फळांचा विमा काढल्यास शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात संरक्षित विमा रक्कम मिळते. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी राष्ट्रीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र येथे विम्याच्या हप्त्याची रक्कम व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये भातासाठी हप्त्याचा दर हेक्टरी 910 रुपये व गुंठ्याला 9.10 पैसे इतकी रक्कम भरावी लागणार आहे. त्याचप्रमाणे नागली पिकासाठी हेक्टरी 400 रुपये तर गुंठ्याला 4.10 पैसे,तसेच भात पिकासाठी 4 5 हजार 500 एवढी साक्षांकित रक्कम तर नागली पिकांसाठी 20 हजार एवढे सुरक्षा कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकर्‍यांचा हप्ता ज्या बँकेतून पिक कर्ज घेतले आहे, तिच बँक हप्ता भरणार आहे.

त्यामुळे फक्त बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी हप्ता भरतांना आधारकार्ड, भाडेपट्टी करार, पेरणी घोषणपत्र  स्वतः घोषित केलेले व स्वतःच्या सहीचे बँक खाते पुस्तक 7/12 उतारा, माहिती भसरलेला विमा फार्म इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. विमा मिळण्यासाठी जोखमीच्या बाबी अपुरा पाऊस, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, पीक पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंत वरील नमूद कारणामुळे होणारे नुकसान,काढणीनंतर होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक नुकसान इत्यादीमुळे होणारे नुकसान संरक्षण कवच मिळते.

विम्याची शेवटची हप्ता भरण्याची तारीख 31 जुलै 2020 ही आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी ताबडतोब या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षक कवच योजनेचा लाभ घ्यावा घेण्यासाठी बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन पीक विमा संरक्षक विम्याचा हप्ता भरावा, असे आवाहन  उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी केले आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास उरण येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ कृषी अधिकारी नागनाथ घरत, कृषी पर्यवेक्षक नवनाथ गरड व प्रकाश कदम यांच्याशी संपर्क साधावा. त्याच प्रमाणे ग्रामपातळीवर कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply