पनवेल ः रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय कॅडेट्स कोप्स (एनसीसी)च्या शहिदांना शतश: नमन कार्यक्रमांतर्गत 8 महाराष्ट्र गर्लस बटालियन मुंबई गट व सीकेटीच्या एनससीसी विभागातर्फे शहीद नाईक हनुमंत कदम यांचे भाऊ श्रीकांत कदम यांना कृतज्ञता फलक प्रदान केले. कर्नल एम. एल. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिचिन्ह आणण्यात आले.
शहीद नाईक हनुमंत कदम यांना 17 डिसेंबर 1962 साली झालेल्या गोवा युद्धात वीरमरण प्राप्त झाले. कृतज्ञता म्हणून हनुमंत यांच्या बंधूंना स्मृतिचिन्ह अर्पण करण्यात आले तसेच शहीद हवालदार चांगदेव नानाजीराव कदम यांचे बंधू विश्राम कदम, रमेश कदम आणि सुनील कदम यांचाही सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ खांदा कॉलोनीचे विश्राम एकम्बेय, सीकेटी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख एम. एम. कांबळे, एएनओ कॅप्टन यु. टी. भंडारे आणि सीटीओ नीलिमा तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली सात कॅडेट्स उपस्थित होते. या उपक्रमाबाबत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.एस.टी.गडदे यांनी कौतुक केले.