Breaking News

कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन

नवीन पनवेल : श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात आयोजित कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आदर्श ग्रुप ऑफ इन्सीट्युटचे चेअरमन धनराज विसपुते, रविंद्र भोईर, प्रभाकर सोनावणे आदी उपस्थित होते.

पनवेल ते श्री शेत्र शिर्डी या पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन

पनवेल : श्री साई तीर्थ प्रतिष्ठान संस्था यांच्या वतीने पनवेल ते श्री शेत्र शिर्डी या पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रतिष्ठानचे विसावे वर्ष असून, शनिवारी या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मनोभावे दर्शन घेत पालखीला खांदा लावला. सोबत भाजप नेते मदन कोळी, गणेश कोळी, गणेश भगत, माजी सुनंदा भगत व इतर.

श्री दत्त गगनगिरी भक्त मंडळाच्या वतीने पालखी सोहळा

खारघर : गगनगिरी महाराजांच्या वर्धापनदिनानिमित्त श्री दत्त गगनगिरी भक्त मंडळाच्या वतीने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजप मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सहचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, मंडळाचे संस्थापक नवलकुमार मोरे, अध्यक्ष एकनाथ मण्यार, खजिनदार ज्ञानेश्वर म्हस्के, लवू सावंत, परब, सुर्वे आदींसह भक्त उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply