Breaking News

ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमीतर्फे बक्षीस वितरण समारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त

ब्रेन क्राफ्ट अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसर्‍या राज्य स्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 12) करण्यात आले होते. हा सोहळा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते यांचे विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या बक्षीस वितरण समारंभाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आदर्श ग्रुप ऑफ इंन्स्टिट्युटचे चेअरमन धनराज विसपुते, कामगार नेते रवि नाईक, कार्यक्रमाचे आयोजक वाहिद बेग, सुरेन्द्र यादव यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply