Breaking News

रेवदंड्यात नागाला दिले जीवदान

रेवदंडा : प्रतिनिधी

चौल भगवती-नवगाव येथील गजानन राऊत यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या बिळांमध्ये साप आढळल्याने परिसरातील सर्वांचीच धावपळ व घबरगुंडी उडाली. कोणीतरी चौलमधील सर्पमित्र स्वप्नील ठाकूर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. स्वप्नील ठाकूर लागलीच घटनास्थळी पोचले. त्यांनी बिळाचे भेावती खड्डा मारून सापाला बाहेर काढण्यास यश मिळविले. अंदाजे साडेपाच फुट लांबीचा हा साप नाग जातीचा असल्याचे सर्पमित्र ठाकूर यांनी सांगितले. या नाग जातीच्या सापाला कार्लेखिंड येथील जंगलभागात सोडून स्वप्नील ठाकूर यांनी त्याला जीवनदान दिले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply