Breaking News

अपघात टाळण्यासाठी चालकांनी सतर्क रहावे

सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन

मुरूड : प्रतिनिधी 

एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याची भावना प्रवाशांमध्ये कायम रहावी, यासाठी चालकांनी वेगमर्यादा पाळून सुरक्षित वाहने चालवावीत व रस्ते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी चालकांनी सर्तक रहावे, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांनी केले.

राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 26  जानेवारी या कालावधीत अपघात सुरक्षा पंधरवडा आयोजित करण्यात येतो. त्यानिमित्त मुरूड आगारात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक निरीक्षक पवार उपस्थित वाहक, चालक व कार्यशाळेतील कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करीत होते. लाख मोलांचे जीव तुमच्या बसने प्रवास करतात, याचे भान कधीही सुटू देऊ नका,

असा सल्ला त्यांनी या वेळी चालकांना दिला. आपल्या भाषणात पवार यांनी मोटर वाहन कायद्यातील कलमांचा संदर्भ देत  वाहन चालकांनी  गणवेशासह  बॅच लावावा. तसेच ताणतणाव असेल तर  वरिष्ठांकडे रजा मागावी, कार्यशाळेत बस जमा करतांना वाहनात काही दोष वा बिघाड असेल तर निःसंकोचपणे सांगावे, असे सुचित केले. वाहन चालक आणि वाहकांनी प्रवाशांप्रती सौजन्य दाखवून एसटीसारखे अन्य सुरक्षित साधन नाही, हे दाखवून देत एसटीपासून दुरावलेला प्रवाशांना जोडले पाहिजे. त्यासाठी संघटीतपणे प्रयत्न करून आगाराचे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी या वेळी केले. मुरूडचे पोलीस उपनिरिक्षक प्रशांत सुभनावळ यांचेही या वेळी समयोचीत भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पाटील यांनी केले. मुरूड मुरुड पोलीास ठाण्याचे उपनिरिक्षक स्वरूप जाधव, वाहतूक निरिक्षक गौतम भोसले, पत्रकार मेघराज जाधव, अक्षय भोईर, संदीप चांदोरकर यांच्यासह मुरूड आगारातील अधिकारी, चालक, वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply