Breaking News

चोरीच्या गुन्ह्यातील दागिने मालकांकडे सुपूर्द

अलिबाग : प्रतिनिधी

पोलीस रेझींग डे चे औचित्य साधून रायगड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने संबंधित मालकांकडे सुपूर्द केले. एकूण 850.37 ग्राम वजनाचे हे दागिने असून, त्यांची किंमत 24 लाख 64 हजार 257 रूपये इतकी आहे. आपले मौल्यवान दागिने हातात पडताच मालकांच्या चेहर्‍यांवरील आनंद लपून राहिला नव्हता. पोलीस रेझिंग-डे निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात किंमती मुद्देमाचे हस्तांतरणाचाही समावेश होता. या कार्यक्रमात एकूण 13 गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आला. यात नेरळ पोलीस ठाण्यातील पाच, कर्जत पोलीस ठाण्यातील तीन, कोलाड पोलीस ठाण्यातील दोन, तर पोयनाड, रोहा आणि गोरेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. त्यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या मालकांनी रायगड जिल्हा पोलीस दलाने बजाविलेल्या कामगिरीचे कौतुक करून धन्यवाद मानले. तसेच भविष्यातसुद्धा अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply