सेंट लुसिया ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसिया येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हॅट्ट्रिक नोंदवत धमाल उडवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला. तब्बल 61 वर्षांनी आफ्रिकेच्या खेळाडूने हॅट्ट्रिक घेतली आहे. यापूर्वी जेफ ग्रिफिन यांनी 1960मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक साधली होती.
दक्षिण आफ्रिकेने दुसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी 324 धावांचे लक्ष्य ठेवले. 107 धावांवर विंडीजने त्यांचे तीन गडी गमावले. अशा परिस्थितीत त्यांना मोठी भागीदारी हवी होती, पण केशव महाराजने विंडीजला हादरे दिले. या फिरकी गोलंदाजीने 37व्या षटकात एकापाठोपाठ तीन खेळाडूंना पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्याने किएरॉन पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ दा सिल्वा यांना माघारी धाडत हॅट्ट्रिक पूर्ण केली. कसोटीत अशी कामगिरी करणारा केशव द. आफ्रिकेचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.
Check Also
नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर
उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper