Breaking News

महायुतीच्या पाठपुराव्यामुळेच व्यापार्यांचे प्रश्न सुटले -शेवाळे

पनवेल : वार्ताहर

बिमा कॉम्प्लेक्समधील व्यापार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. श्रीरंग बारणे तसेच स्थानिक आ. प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी व्यापारी बंधूंनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी उभे राहावे व

धनुष्यबाणाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी व्यापार्‍यांच्या बैठकीत केले.

या बैठकीला उमेदवार खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, अनिता पाटील, प्रवीण पाटील, प्रमिला उपाध्याय, रामजी बोरा, ब्रिजेश पटेल, लिना गरड, नरेश ठाकूर, नेत्रा पाटील, अजय बहिरा, निलेश बाविस्कर, गीता चौधरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी  उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यापार्‍यांचे प्रश्न जाणून घेतले. त्याचप्रमाणे आ. प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा व्यापारी वर्गाच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहिलो आहोत. आगामी काळातसुद्धा त्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी सभागृहात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत महायुतीने भरघोस असे काम केले आहे. विविध विकासाच्या योजना देशात व राज्यात राबविण्यात आल्या आहेत. आता पुन्हा मतदान करण्याची वेळ आली असून जे सरकार आपल्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहे, अशा सरकारचे उमेदवार म्हणजेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या. दिवसातील दोन तास आपण काढा व आपल्या मित्रमंडळी व परिवारात जाऊन श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार करा व धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मोदींचे हात बळकट करा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply