Breaking News

‘सीएए’चा भारतीयांना धोका नाही

सूर्यकांत केळकर यांचे प्रतिपादन

नागोठणे : प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सी.ए.ए.) भारतीय नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन भारत रक्षा मंचचे  राष्ट्रीय संघटन मंत्री सूर्यकांत केळकर यांनी येथील हिंदू जन जागृती मंच, नागोठणे विभागाची नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देण्यासाठी येथील ग्रामदैवत श्री. जोगेश्वरीमाता मंदिराच्या प्रांगणात बुधवारी  जाहीर सभेत स्पष्ट  केले. या सभेला क्षेत्र संघटक मंत्री प्रशांत कोतवाल, अ‍ॅड.अंकित बागेरा, अ‍ॅड.अनिकेत ठाकूर,विणाताई घोगरी,डॉ.मनीषा कुंटे यांच्यासह विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थितांना मार्गदर्शन करताना केळकर यांनी सांगितले की,केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणला. हा कायदा आपल्या देशात बेकायदेशीर घुसखोरी करून आलेल्या बाहेरील देशांच्या लोकांना चाप बसावा यासाठी आहे. या देशात वर्षानुवषे राहात असलेले नागरिक मग ते कोणत्याही जातीधर्माचे असावे, त्यांना याचा कोणताही धोका नाही. आपल्या इथे बांगलादेशीय घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आपली कुठलीही भाषा येत नाही तरीही त्यांचा सर्वत्र वावर दिसत आहेत. त्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही भारत रक्षा मंचने मागणी केल्यामुळे हा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणल्याचे केळकर यांनी सांगितले. अ‍ॅड.अनिकेत ठाकूर यांनी हा कायदा समजून न घेता आंदोलने होत आहेत. यामध्ये विरोधाला विरोध करायचा हाच हेतूआहे. ही भेडसावणारी समस्या संविधान राखून कायदाचा वापर करून बाहेर काढली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अ‍ॅड.अंकित बागेरा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची सविस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या मनात असलेल्या शंका दूर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारकरी परिषदचे बापूमहाराज रावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जनजागृती मंचचे अध्यक्ष योगेश ठाकूर यांनी ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र तसेच शिवाजी महाराजांचा जयजयकार करून करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर म्हात्रे,आनंद लाड,तिरतराव पोलसानी,निखील मढवी,मनोज धात्रक,योगेश ठाकूर,जीवन जैन,राकेश जैन,मंदार चितळे,धनंजय जगताप,समीर पंडित, अ‍ॅड.श्रीकांत रावकर,चेतन कामथे,प्रथमेश काळे,सुदेश येरुणकर,भरत गिजे,बंटी बामणे,सुनील लाड,शेखर गोळे,नितिन राऊत,अमित कोपर्डे तसेच हिंदू जन जागृती मंचचे सर्व पदाधिकारी-सदस्यांसह विभागातील तरुणांनी मेहनत घेतली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply