Breaking News

डॉ. विजय सूर्यवंशी पीएमपी अध्यक्षपदी

पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नयना गुंडे यांनी दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची केवळ 10 महिन्यांतच बदली करण्यात आली होती. त्यानंतर गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी आली. त्यांनाही केवळ एक वर्ष 11 महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांच्या कार्यकाळामध्ये पीएमपीच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रीक बस, 200 मिडी बसेस, तर सुमारे 400 सीएनजी बस दाखल झाल्या. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीएमपीला बसेस मिळाल्या आहेत. त्यांनी बस खरेदी व भाडेतत्त्वाची प्रक्रिया वेगाने पार पाडली. देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस दाखल झाल्या. भेकराईनगर व निगडी हे दोन आगार देशातील पहिले ई-आगार ठरले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply