मुरुड : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यातील एकदरा गावात बुधवारी (दि. 21) रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाचे संकट लवकर दूर करा, अशी प्रार्थना श्री रामांकडे करण्यात आली.
मागील 58 वर्षांपासून एकदरा गावात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून अत्यन्त साधेपणात रामनवमी साजरी केली जात आहे. बुधवारी पुजारी रामकृष्ण आगरकर यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात आली.
या वेळी चंद्रकांत पाटील, धर्मा लोदी, उद्देश गंबास, महादेव मिनदाडकर यांच्यासह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी उमेश केशव गोबरे यांचे सुपुत्र निल व हर्ष गोबरे यांनी रामायणातील लव व कुश यांचा पेहराव केला होता. त्यांचा हा पेहराव अत्यंत देखणा झाल्याने सर्वानी या दोन बालकांचे कौतुक केले.
मुरुड तालुक्यातील विविध राम मंदिरात अत्यन्त साधेपणात पूजा करण्यात आली आहे.