Breaking News

राज्यात विविध विभागांत तब्बल 75 हजार पदे भरली जाणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे नोकरभरतीला घातलेली 50%ची मर्यादा शिथिल करीत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात शासनाच्या 29 विभागांमध्ये 75 हजार पदांची नोकर भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील शासकीय आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार सरकारने ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे. ज्या विभाग-कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशांतील गट अ, ब व कमधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात येत आहे. वरील (अ) आणि (ब) प्रमाणे शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023पर्यंत लागू राहील. त्या पुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 अन्वये करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने नोकरभरतीवर राज्य सरकारने बंधने आणली होती. 50 टक्के मर्यादा ठेवून नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण कोविड संपताच शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे आता शंभर टक्के नोकर भरती होणार आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अशी होणार नोकरभरती
आरोग्य खाते : 10 हजार 568
गृह खाते : 14 हजार 956
ग्रामविकास खाते ः 11,000
कृषी खाते : 2500
सार्व. बांधकाम खाते : 8,337
नगरविकास खाते : 1500
जलसंपदा खाते : 8227
जलसंधारण खाते : 2,423
पशुसंवर्धन खाते : 1,047

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply