पेण : भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ‘महाभारत कधी व कोठे झाले?‘ या विषयावर निलेश ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. डॉ. टी. डी. माळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी निलेश ओक यांनी महाभारत नेमकं कधी व कोठे झाले, हे सोप्या पद्धतीने सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खाडिलकर मॅडम यांनी केले. बापुसाहेब नेने, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, शुभांगी नेने, बाळासाहेब जोशी यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …