अलिबाग : प्रतिनिधी : सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचे रिसॉर्ट पडण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही कारवाई केली जाणार आहे. अशोक मित्तल यांचे अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे हॉलिडे रिसॉर्ट आहे. बॉम्बे इन्व्हर्मेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सीआरझेडचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश 1 नोव्हेंबर 2018 रोजी मुबंई उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी अशोक मित्तल यांना तीन महिन्यांच्या मुदतीत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस दिली आहे. ही मुदत संपली असून जिल्हा प्रशासनाकडून हे रिसॉर्ट पडण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …