Breaking News

उकरूळातील तलावाने घेतला मोकळा श्वास; कृषीरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून कायापालट

कर्जत ़: बातमीदार

राज्य शासनाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेखर भडसावळे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील उकरूळ गावातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे जलपर्णीत  हरवून बसलेल्या या गाव तलावाने मोकळा श्वास घेतला आहे.

उकरूळ गावातील तलाव मातीने भरून गेला होता, त्यात झाडे झुडपे, जलपर्णी, रानटी झाडे वाढली होती. या गाव तलावाच्या स्वच्छतेसाठी सरपंच वंदना थोरवे यांनी कृषीरत्न शेखर भडसावळे यांना मदतीचे आवाहन केले. आणि शेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उकरूळ गावातील जलपर्णी, रानटी झाडे आणि मातीत रुतून बसलेल्या गाव तलावाच्या संवर्धनाचे काम सुरु झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने कुठवर माती काढायची, जलपर्णींची मूळं कुठवर असतील याचा अभ्यास असलेल्या भडसावळे यांनी आठ दिवस अथक प्रयत्न करून उकरूळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गाव तलावाला नवीन रूप दिले. तसेच या तलावाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून त्यावर भाजीपाला शेती कशा पद्धतीने करता येईल, याचे मार्गदर्शनही भडसावळे यांनी केले.

उकरूळ गावातील तलाव मातीने भरून गेला होता, त्यात झाडे झुडपे वाढली होती. कृषीरत्न शेखर भडसावळे यांचा सल्ला, मार्गदर्शन आणि मदत घेतल्याने आम्हाला गाव तलावाचे रूप पालटता आले. -वंदना थोरवे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत उकरूळ, ता. कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply