Breaking News

‘सीकेटी’च्या हिंदी विभागातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्) 14 व 15 फेब्रुवारीला ‘हिंदी और मराठी दलित साहित्य में अभिव्यक्त क्रांति चेतना’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र हिंदी विभागातर्फे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे करण्यात आले. चर्चासत्र राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (ठणडअ) द्वारा पुरस्कृत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग मोतीसिंग बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे यांनी महाविद्यालयाच्या गौरवशाली इतिहासाची थोडक्यात माहिती दिली. तसेच कला विभाग प्रमुख डॉ. उद्धव तुकाराम भंडारे यांनी चर्चासत्र व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. गीतिका तँवर यांनी केले. चर्चासत्रासाठी भारताच्या अनेक राज्यातून प्राध्यापक, शोधकर्ता, राजभाषा अधिकारी व हिंदीप्रेमी विद्यार्थी मिळून 187 जण सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध दलित साहित्यकार डॉ. जयप्रकाश कर्दम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या हिंदी विभागाचे डॉ. अर्जुन चव्हाण, प्रसिद्ध लेखक डॉ. सूर्यनारायण रणसुभे, मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. रतनकुमार पांडे, प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव उपस्थित होते. या व्यतिरिक्त डॉ. दिलीप मेहरा, डॉ. परिहार सुरजीतसिंग, डॉ. अर्जुन घरत, डॉ. हुबनाथ पाण्डेय, डॉ. मनप्रीत कौर, डॉ. मनोहर भंडारे, डॉ. मेदीनी अंजनीकर, डॉ. अनिल ढवळे, डॉ. बालकवी सुंरजे, डॉ. रमेश कुरे, तसेच महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने 150 शोधआलेख प्राप्त झाले. त्यामधून 60 आलेख शोधप्रतिकामध्ये प्रकाशित करण्यात आले. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी  मोलाचे योगदान दिले. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाचे संस्थेचे चेअरमन, माजी  खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, सभागृह नेते परेश ठाकूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी कौतुक केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply