Breaking News

भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर घरत

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. भाजप रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी रायगड (उत्तर) जिल्हा कार्यकारिणी नव्याने जाहीर केली. त्यामध्ये लढाऊ कामगार नेते सुधीर घरत यांची भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या रायगड (उत्तर) जिल्हाअध्यक्षपदी नेमणूक केली आहे. या बद्दल सुधीर घरत यांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप शहर अध्यक्ष कौशिक शाह, भाजप तालुका उपाध्यक्ष दीपक भोईर, जसिम गॅस व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. गेली पाच वर्षे वाहतूकदारांच्या प्रश्नांवर लढणारे, स्थानिकांना  वाह्तुकीचा व्यवसाय मिळावा या करिता सदैव प्रयत्नशील असणार्‍या सुधीर घरत यांची भाजप वाहतूक सेल रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी निवड करून एकप्रकारे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. आमदार महेश बालदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी सुधीर घरत यांची ओळख आहे. लढाऊ कामगार नेता, अत्यंत परखड व स्पष्टपणे आपली मते मांडणारा उत्कृष्ट वक्ता व कार्यकर्त्यांच्या सोबत असणारा मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणजे सुधीर घरत त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीने कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या निवडीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, ज्येष्ठ नेते पी. जे. पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र घरत, तालुका सरचिटणीस दीपक भोईर, सुनील पाटील, योगेश तांडेल, नवघर ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी, नवघर महिला मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी  अभिनंदन केले.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply