Breaking News

पनवेल शहर पोेलिसांतर्फे के. वी. कन्या शाळेत कार्यशाळा

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहर पोलिसांनी महिला वर्गामध्ये तसेच अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनीची

कार्यशाळा घेतली होती.

महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे व महिला पोलीस नाईक विद्या भगत यांनी या शाळेत जावून विद्यार्थींनीची कार्यशाळा घेतली. या वेळी सुमारे 150 आसपास विद्यार्थीनी व शिक्षक वर्ग उपस्थित होता. या कार्यशाळेत उपस्थित मुलींना लैंगिक अत्याचाराबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे ज्युवेनाईल अ‍ॅक्ट व छेडछाडबाबत त्यांची तक्रार असल्यास संबंधित पोलीस ठाण्याचे फोन नंबर त्याचप्रमाणे कोणाची भिती न बाळगता पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. काही माहिती गोपनीय असल्यास याबाबत त्यांनी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी. ही माहिती दिल्याबद्दल त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असा विश्वास सुद्धा उपस्थित विद्यार्थीनींना या वेळी अधिकारी वर्गाने दिला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply