Breaking News

विश्व हिंदू परिषद, वारकरी सांप्रदायाकडून शासनाचा निषेध

कर्जत तहसीलमध्ये भजन आंदोलन; वारीच्या माध्यमातून निवेदन सादर

कडाव : प्रतिनिधी

पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवणार्‍या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 17) कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाचा जाहीर निषेध करुन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक आणि त्यानंतर त्यांना फसवून नजरकैदेत ठेवणे, वारकर्‍यांना भररस्त्यात पारंपरिक गणवेश उतरवायला लावणे, हिंदूत्व व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्माच्या पताकांची अवहेलना करणे, निरपराध संतांना अटक करणे, त्यांना अपराध्याची वागणूक देणे, जागोजागी वारकर्‍यांची अडवणूक करणे आदी घटना घडल्या आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी कर्जतमधील वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात आले तसेच वारी काढून शासनाच्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

रायगडभूषण ह.भ.प. मारुती महाराज राणे, ह.भ.प. नामदेव महाराज जाधव, ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे, बजरंग दलाचे कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे, विश्व हिंदू परिषदेचे तालुका प्रखंड विशाल जोशी, तसेच ह.भ.प. प्रभाकर बडेकर, चंद्रकांत कडू, अनंत हजारे, महेश बडेकर, शंकर म्हसे, दत्ता म्हसे, कृष्णा पालकर, अर्जुन देशमुख, दौलत देशमुख, वासुदेव बडेकर, संदीप सुर्वे, दत्ता कदम, संजीव दातार, महेश निघोजकर, अ‍ॅड. गायत्री परांजपे यांच्यासह वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एकीकडे दारूची दुकाने, बार सुरू असताना मंदिरे, वारी सुरू करण्यास मात्र अटकाव केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. वारकरी सांप्रदायाच्या पारंपरिक पायी वारीवरील बंदी उठवून वारकर्‍यांवरील अन्याय थांबणे गरजेचे आहे.

-साईनाथ श्रीखंडे, संयोजक, बजरंग दल कुलाबा

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply