Breaking News

‘सीकेटी‘ संकुलात विज्ञान महोत्सव उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध वैज्ञानिक उपक्रम व नवीन संशोधकांना प्रोत्साहान देण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे विश्वविमी विज्ञान महोत्सव 2020चे आयोजन सीकेटी नवीन पनवेल संकुलात

करण्यात आले होते.

या वेळी विविध वैज्ञानिक विषयांर्तगत सुमारे 500 हून अधिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले.  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे अरूण देशमुख, सुजाता माने, वर्षा शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी या प्रकल्पांचे मूल्यमापन केले.

या विज्ञान महोत्सवाचे स्वरूप केवळ महागडे प्रोजेक्ट लॅब मधील प्रात्याक्षिके नसून आपल्या दैनंदिन वापरातील असणार्‍या किंवा सभोवताली असणार्‍या गोष्टींमध्ये जे विज्ञान लपले आहे ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे हे या महोत्सवाचे मुख्य स्वरूप होते.

या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आज सर्व शाळांमध्ये विज्ञान दिन साजरा होत असतोच पण प्रत्येकवर्षी असलेले साचेबध्द विषय व त्यामध्ये कार्य करणारे निवडक विद्यार्थी यांच्या मर्यादा दूर करून आकर्षक व नाविन्यपूर्ण विषय ज्यामध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचून त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होईल, असा विश्वास व्यक्त केला. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षिका व विद्यालयातील विज्ञान मंडळ व शिक्षक यांचे मोलाचे

सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply