पनवेल : रामप्रहर वृत्त – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील डी. एन. मिश्रा रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय मोर्चा व यांचे मित्र सुरेंद्र शुक्ला समाराम चौधरी रामदेव पांडे यांनी मिळून गरजू गरीब कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल अशा रेशनचे वाटप केले.
यामध्ये कळंबोलीतील 150 कुटुंब, पेंदर गावातील 35 कुटुंब, तोंडरा गावातील 30 कुटुंब, घोट गावातील 25 कुटुंब, कामोठे 20 कुटुंब अशा कुटुंबातील लोकांना रेशन वाटप करून एक खूप चांगला आदर्श जनते समोर ठेवला आहे. यांच्या प्रेरणेने अनेक लोकांनी यांचे आभार मानले.