रेवदंडा ः कोरोनाच्या संकटकाळी ग्रामस्थांसाठी स्तुत्य उपक्रम राबवणारी नागाव ग्रामपंचायत व सरपंच निखिल मयेकर यांच्या योगदानास गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी मदतनिधीचा हात दिला. गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी सरपंच निखिल मयेकर यांच्याकडे पाच हजारांचा मदतनिधी प्रदान केला. गजानन महाराज भक्त परिवार व अवधूत आवठले यांनी केलेल्या मदतीबद्दल सरपंच निखिल मयेकर यांनी नागाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेेत.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper