माणगाव ः प्रतिनिधी
जमावबंदीचे आदेश असतानाही जुगार खेळणार्या निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील कोस्ते बुद्रुक येथील सात जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 8) याच भागातील बामणगाव येथे जुगार खेळणार्या 10 जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मोबाइल व रोख रकमेसह 5889 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याची फिर्याद कॉन्स्टेबल गोविंद तलवारे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी 10 आरोपींविरोधात गुन्हा नं 67/2020 महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887चे कलम 12(अ) भां. दं. वि. कलम 188, 269, 270प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर दूरक्षेत्राचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक करे करीत आहेत.