पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या संकटाने व लॉकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. पनवेल परिसरातील पत्रकारही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. पत्रकारांची ही अडचण ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी नगराध्यक्ष, उद्योगपती जे.एम. म्हात्रे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच काही लोकांनी व संस्थांनी पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोझ यांचे देखील वाटप केले आहे. पत्रकारांची आजची अडचणीची परिस्थिती ओळखून नवीन पनवेल येथील दानशूर व्यक्तिमत्व व कोकण संध्याचे कार्यकारी संपादक संजय नोगजा यांनी देखील अत्यंत गरजू पत्रकारांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे व पत्रकारांच्या अडचणीच्या काळामध्ये आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत असेही संजय नोगजा यांनी स्पष्ट केले आहे. संजय नोगजा यांच्या या मदतीबद्दल पत्रकार दीपक महाडिक व केवल महाडिक यांनी आभार व्यक्त केले आहेत.