Breaking News

रस्त्याच्या कामाला सुरुवात

रहिवाश्यांसह प्रवांशाकडून भाजपचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष व बुथ कमिटी 428चे अध्यक्ष रावसाहेब खरात यांच्या यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या थांबलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशी व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बरेच वर्षांपासून प्रभाग क्रमांक 17 मधील नर्मदा कॉम्प्लेक्स पाण्याच्या हौदापासून पनवेल रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे व पाण्याच्या हौदामध्ये पाणी फिल्टर केल्यानंतर गढूळ पाणी एका मोठ्या पाईप लाईन द्वारे सोडले जाते, परंतू त्या पाईप लाईनमध्ये गाळ व माती साठल्यामुळे पाणी फिल्टर केल्यानंतर भिंतीतून बाहेर रस्त्यावर यायचे. पाण्यामुळे रस्त्यावरचे खड्डे दिसत नसल्यामुळे बरेच वेळा अपघात घडले. खराब झालेल्या रस्त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वेने येणार्‍या जाणार्‍या प्रवासी त्रस्त झाले होते.
माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब खरात यांनी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा करून खराब झालेला रस्ता डांबरीकरण करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी आणि रेल्वे प्रवांशा कडून आभार मानले.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply