Breaking News

श्रीवर्धन येथील मासेमारी तीन दिवस बंद

मच्छीमारांसह गावकर्‍यांचा निर्णय

श्रीवर्धन : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर हे मच्छीमारी खरेदी विक्रीचा प्रमुख बंदर आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. ते रोखण्यासाठी मच्छिमारांनी आणि गावकर्‍यांने मासेमारी करण्यास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवार ते मंगळवार हे तीन दिवस पुर्ण बंद ठेवण्यात आले आहे.

गावामधील छोटी मोठी किराणा मालाची दुकाने सुध्दा बंद ठेवण्यात आले आहे. ह्या तीन दिवसामध्ये कोणही घराच्या बाहेर पडू नये असे ठरविले आहे. तसेच कोणत्या मच्छीमारांनी आपल्या नौकाच्या कामासाठी बाहेर पडू नये यासाठी खालचा जीवना कोळीवाडा व वरचा जीवना कोळीवाडा येथील मुख्य नाक्याजवळ गावातील प्रमुख दोन ते तीन व्यक्तीचा सतर्क पहारा ठेवण्यात आला आहे.

पहिल्याच दिवशी जीवना कोळीवाडा येथील नागरिकांने उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या गावामध्ये वरळी येथून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्याला पनवेल येथील ग्रामविकास भवन या ठिकाणी पाठवण्यात आले, तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या त्याचे तीन मुले व पत्नी यांना हि कोरोनाची लागण झाली आहे. एकुण श्रीवर्धन मध्ये 5 कोरोनाचे रुग्ण झाले आहे. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोष्टीची खबरदारी श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा येथील मच्छिमार यांनी घेतली असुन मच्छीमार व गावकरी यांच्या सुरक्षितेसाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोळीबांधवाने आपला कोळीवाडा जणू काही सील केल्यासारखे वाटत आहे.

या वर्षी समुद्रात अनेक वेळा समुद्री छोटे मोठे वादळे आले. तसेच क्यॉर चक्रीवाद, महाकाय, बुलबुल अशाप्रकारे अनेक वादळे आल्याने कोळी बांधव हे आर्थिक संकटात सापडले आहे. आता काही दिवसावर पावसाला आला आहे. त्या वेळी पुन्हा आपल्या नौका बंद ठेवण्यात येणार आहे. कोळी बांधवाचा मासेमारी एकमेव प्रमुख व्यवसाय आहे. यावरच त्यांची उपजीविका चालत आसते. मच्छिमारांनाचे कंबरडे मोडलेले आहे. तरी सुध्दा महाभयंकर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तीन दिवस कडकडीत बंद पुकारला आहे. या बंदीचे सर्वच कोळी बांधव तंतोतंत पालन करीत आहे.

दोन्ही कोळीवाडा मधील रस्त्यावर शुकशुकाट पहावयाला मिळत आहे. जीवना बंदर येथील मासेविक्री बंदरावर तर निरमनुष्य दिसत आहे.  सर्व नौका ह्या किनार्‍यावर नांगरून ठेवल्या आहेत. बंद यशस्वी होण्यासाठी जीवना कोळीवाडा येथील तिन्ही पार्टीचे अध्यक्ष व पंच कमेटी यांनी आप घरामधून सतर्क ठेवला आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply