पनवेल : प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नाने सुटला. असून दोन-तीन दिवसात त्यांचे पेन्शन बँकेत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन मागील बर्याच कालावधीपासून थकीत होती, याबाबत सर्वच सेवानिवृत्त शिक्षकांनी नगरसेविका दर्शना भोईर यांची भेट घेऊन थकीत पेन्शनचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांचा पेन्शनचा विषय महत्वाचा असल्याने त्यांनी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पेन्शनचा विषय गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख
यांच्याशी चर्चा केली. सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनबाबत आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्यास सांगून पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या बँक खात्यात पेन्शन जमा करण्यात येईल, असे सांगितले. नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नामुळे सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची बर्याच कालावधीपासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण होणार आहे.