पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील लिंगप्पा मनोहर वाघमारे (55) (मूळ रा. अक्कलकोट) हे 17 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून पिंपळपाडा येथील मालकाच्या घरातून कोणास न सांगता निघून गेले आहेत. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या इसमाची उंची चार फूट तीन इंच, बांधा मध्यम, रंग गहुवर्णीय, केस बारीक काळे पांढरे झालेले, दाढी मिशी काढलेली, अंगात गुलाबी रंगाची फूल पॅण्ट, तसेच पायात रबरी लाल रंगाची चप्पल आहे. या वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास पेण पोलीस ठाणे फोन क्र. 02143-252066 किंवा तपास अधिकारी पी. के. वाढवे मो. नं. 9011803093 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.