पनवेल : बातमीदार
सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेअंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे सिडकोने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या खारघर येथील 810 घरांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात आली. यातील पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी www.cidco.nivarakendra.inया वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येणार असल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात आले. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-2018 अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील 14 हजार 838 परवडणार्या घरांची योजना सिडकोने 13 ऑगस्ट 2018 रोजी जाहीर केली होती. यातील प्रतीक्षा यादीतील पात्र अर्जदारांची अंतिम यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. ही यादीही याच वेबसाइटवर उपलब्ध आहे. सिडकोतर्फे काही भूखंड ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांपैकी नवीन पनवेल (प.) व खारघर येथील आठ सर्वाधिक बोलीधारकांना भूखंडांचे वापटपत्र नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात सात कम्युनिटी किचन सेंटर्स
कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना जैविक युद्धात देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील बेघर, निराधार, रोजंदार, विस्तापित कामगार व गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये म्हणून तळोजा औद्योगिक विभागात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका व पनवेल तहसील यांच्या संयुक्तपणे तळोजा औद्योगिक विभागात विविध ठिकाणी सात कम्युनिटी किचन सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. याचा 6000 नागरिक लाभ घेणार आहेत. या किचन सेंटरमुळे या औद्योगिक विभागातील कोणाही व्यक्ती उपाशी राहणार असा आत्मविश्वास पालिका अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. धान्य वाटप करण्यापेक्षा असे सेंटर अगोदरच सुरू करण्यात आले असते तर धान्य वाटपात अनियमितता झाली नसती आणि याचा फायदा सर्वांना घेता आला असता समाधानकारक बरोबर नाराज प्रतिक्रीयाही त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक विभागातील कारखाने बंद आहेत. निराधार, रोजनदारी, विस्तापित कामगार, गरीब, गरजू हातावर पोट भरणार्या कामगार व नागरिकांच्या हाताला काम नसल्याने त्यांना एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करत व समाजिक बांधिलकी जपत पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तळोजा औद्योगिक विभागातील सात गावात कम्युनिटी किचन सेंटर सुरू केले आहेत. त्यातील पडघे येथील कम्युन्टी चिकन सेंटरमध्ये 850, तोंडरे येथे 610, देविचापाडामध्ये 920 तर ढोंग-याचापाडा-520, तर पालेखुर्द कम्युनिटी चिकन सेंटरमध्ये -100, पेधरमध्ये 640, तर घोटगावात 520 असे एकून 5000 हजार नागरिक लाभ घेत आहेत. भोजन वाटप योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने ती सहा हजाराच्या वर जाईल असा विश्वास पनवेल महानगरपालिका अधिकारी हरिश्चंद्र कडू यानी व्यक्त केला. सदर योजनेच्या भोजन वाटपाचे काम प्रभाग समिती ‘अ’ अन्यधान्य समितीचे पथक प्रमुख भगवान पाटील, नावडे उपविभाग अधिक्षक हरिश्चंद्र कडू, रमाकांत तांडेल, नावडे विभागाचे कर्मचारी व पनवेल तहसील विभागाचे कर्मचारी वर्ग संयुक्तपणे यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या या कम्युनिटी किचन सेंटरमुळे पालिका आयुक्त गणेश देशमुख व पनवेल तहसिलदार अमित सानप यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक निराधार गरीब कष्टकरी रोजंदारीवर काम करणार्या परीवारांच्या हाताला काम न राहिल्यामुळे त्यांची अवस्था खुप वाईट झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिवारांना एक समाजाशी बांधिलकी म्हणून चिरनेर मधील काही युवक एकत्र येऊन आपापल्या परीने चार ते पाच दिवस पुरेल एवढे किराणा मालाचे सामान 60 ते 70 कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे. या गरजूंना मदतीचा हात मिळाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावर एक स्मित हास्य उमटले आहे.