नवी मुंबई : बातमीदार
भाजपचे उत्तर भारतीय सेल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय यांची शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्री नवी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. भूमिहार समाजाचे दीनबंधु राय, कैप्टेन स. के. राय, अनिरुद्ध राय, दिनेश राय, अजय राय, दुर्गेश राय, मनोज राय यांनी राजेश राय यांची भेट घेतली. या वेळी शाश्वत हिंदू संघटनेच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व उपस्थितांनी राजेश राय यांच्यासोबत संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच नवी मुंबईत संघटना वाढवण्यासाठी व नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राजेश राय यांनी उपस्थितांना सांगितले.