Breaking News

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुुरुवात; कळंबोलीत सिडकोकडून रस्त्यांची दुरुस्ती

पनवेल : बातमीदार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोची विविध कामे बंद करण्यात आली होती. अखेर कळंबोलीत रखडलेली रस्ता डागडुजीची कामे बुधवारपासून सुरू करण्यात आली. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सिडकोचे प्रयत्न आहेत.

कळंबोलीतील गटारे, पदपथ आणि रस्ता दुरुस्ती, मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे, सांडपाण्याच्या मार्गाची दुरुस्ती, उघड्या भूखंडावरील डेब्रिज उचलणे आदी कामे सिडकोने हाती घेतली होती. कळंबोली सेक्टर 1 ते 23 आणि 1 ई ते 16 ई मधील सर्व भागांचा यात समावेश आहे. त्यासाठी झेनिथ कंन्ट्रक्शन कंपनीला आठ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. सिडकोने ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये कामाचे आदेश देऊन कामे सुरू केली होती. दोन ते तीन महिने सुरू असलेली कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाली. कळंबोलीतील मुख्य रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याचे काम देखील बंद होते. सिडकोने ही कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कामांना सुरुवात झाली आली. कळंबोली शहरातील मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराला कामगारांची अडचण असली तरी शक्य ती कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली. कळंबोली शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाही तर, नागरिकांना पावसाळ्यात गैरसोईचा सामना करावा लागणार आहे. म्हणून ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते.

उरणमध्ये नगरपालिका कर्मचार्‍यांकडून नालेसफाई

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूचा संपर्ण जगभर विळखा पडला असतानाही उरण नगरपालिकेचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता शहरातील नालेसफाई करीत आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. यामुळे लॉकडाऊन सूरु आहे. यामुळे सर्व वातावरण बदलले असून ठराविक वेळेतच खरेदी विक्री करावी लागत आहे. त्यानंतर फिरण्यास सक्त मनाई आहे. असे वातावरण असतानाही उरण नगरपालिकेचे कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन जनतेला सोयी सुविधा देण्याचे  काम करीत आहे. काही दिवसांवर पावसाचे आगमन होणार आहे. त्याआधी शहरातील नालेसफाईची कामे सुरू झाली आहेत. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी कोरोनाची भीती न बाळगता जनतेला सोयी सुविधा पुरविणे हे आपले कर्तव्य मानीत काम करीत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात ही सफाई कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply