Breaking News

पेण तालुक्यात मास्क, सॅनिटायझर्सचा तुटवडा

पेण : प्रतिनिधी

कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क वापरण्याचा व हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझर्स विक्रीत अचानक वाढ झाली असून, पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे 1 आणि आणि पुणे येथे 15 रुग्ण आढळल्याने सतर्कता बाळगली जात आहे. कोरोना आजारामुळे डेटॉल मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पेण तालुक्यात मात्र मास्क  आणि सॅनिटायझरचा तुटवडा झाला असून, याला  औषधविक्रेत्यांनीही दुजोरा दिला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply