पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, कोनगाव येथे प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.
यामध्ये उलवे येथील सेक्टर 5, प्लॉट नं.57, उलवे येथील डव्हर्ट बिल्डिंग, उलवे येथील सेक्टर 19, उलवे येथील उन्नती बिल्डिंग, यूएल-2,बिल्डिंग नं.1 ही इमारत, विचुंबे येथील ग्रीन व्हॅली बिल्डिंग, बिल्डिंग नं.3, 4, 5 या इमारती, कोनगाव येथील रमेश घरत चाळ, कोनगाव, पूर्वेस कैलास शिसवे यांचे घर, पश्चिमेस शंकर मंदिर, दक्षिणेस कमान/ कोरडे दुकान/ पनवेल-खोपोली हायवे, उत्तरेस गुरुनाथ यांचे घर हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
सुरकीचा पाडा परिसर कंटेन्मेंट झोन
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे गावी एकूण 22 व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जून कोळी यांच्या घराशेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिश्चंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रविंद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरी नाखवा यांच्या घरामधील गल्ली व भवानी चौक येथील जेटीकडे जाणारा अर्धा रस्ता, उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
मात्र या परिसरात अधिक कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने या क्षेत्राबरोबरच कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या घरापासून पूर्वेला डॉ. प्रकाश नाखवा यांच्या घराजवळील रस्ता, पश्चिमेला संजय मधूकर नाखवा व सत्यम गजानन कोळी यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला जेटीकडील भवानी चौक, उत्तरेला रामेश्वर प्रोव्हिन स्टोअर्स बाजूची गल्ली हा वाढीव परिसर पुढील 28 दिवस कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.