मुरूड ः प्रतिनिधी
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संजीवनी आरोग्य सेवेने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. संजीवनीचे सदस्य आरोग्यसेवक कामाला लागले आह्ेत. मुरूड तहसीलदार व नगरपालिकेची परवानगी घेऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे कोरोनाची प्राथमिक तपासणी सुरू करण्यात आली. आठ दिवसांत पाच हजर जणांची तपासणी पूर्ण झाली. त्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.
संजीवनीचे अध्यक्ष विजय सुर्वे, नगराध्यक्ष स्नेहा पाटील, चंद्रकांत अपराध, आदेश दांडेकर, कीर्ती शहा, अमित कावळे, राकेश भगत, आशासेविका दक्षता गुरव चोगले, सुभाष हुरजुके, मनोज पुलेकर, मितेश माळी, अकबर पठाण, नगरसेविका आरती गुरव, प्रांजल मकु, अनुजा दांडेकर हे सर्व
आरोग्यसेवक मुरुड शहरात घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी करून तपासणी करण्याच्या कामाला लागले आहेत.